डीवायएसपी कुमावत करू शकतात..!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
आंबेजोगाईचे डिवाएसपी दोन दिवस रजेवर गेल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार केजचे डिवायएसपी कुमावत यांच्याकडे देण्यात आला आहे कोणत्याही पदावर असणारा अधिकारी काय करू शकतो हे उपअधीक्षक कुमावत यांनी दाखवून दिले आहे
आंबेजोगाई शहर व परिसरात गुटख्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना व्यसनाधीन बनवणारा गुटखा विक्रीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली असताना शहरात दररोज लाखो रुपयांची गुटखा विक्री करणाऱ्या ठोक विक्रेता गणेश बिडवे यांच्या गोडाऊन वर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा गुटखा पकडला शहरातील अनेक पान टपरीवर धाडी टाकत गुटखा पकडला. या भीतीपोटी आज दिवसभर शहरातील एकही पान टपरी उघडली नव्हती याला म्हणतात पोलिसी धाक. आंबेजोगाई शहरातील अनेक नागरिकांनी पोलिस उपाधीक्षक कुमावत यांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे.
अंबेजोगाई शहरातील वाढती गुंडगिरी मटका गुटखा घरफोड्या अवैध वाहतूक अशा विविध समस्यांचे भयानक स्वरूप धारण केले असून पोलिसांनी यावर प्रतिबंध केला पाहिजे असा मुद्दा अनेक वेळा वर्तमानपत्रातून बातम्या छापून उपस्थित केला असता पोलीस खात्याच्या वतीने पोलिसांची अपुरी संख्या हे कारण पुढे करत आमची इच्छा आहे मात्र काय करणार ? अशी असमर्थता दर्शवली जात होती.
पोलिसांची अपुरी संख्या कारण पुढे करत मजबूर असल्याचे सांगितले जाते. ही बाब जरी खरे ही असेल यात दुमत नाही यासंदर्भात जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी पालकमंत्री यांनी या बाबीवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
रजेच्या काळात आलेल्या पोलिस उपाधीक्षक कुमावत यांनी गुटका माफिया विरुद्ध धाड मारायला वेगळी कुमक बीड हुन मागवली नव्हती .आहेत त्या पोलिसांना सोबत घेऊन धाडसी कार्यवाही केली जी आज पर्यंत गुटका माफियाना कोणी हात लावला नव्हता अधिकाऱ्यांमध्ये कार्यवाही करण्याची मानसिकता असेल तर पोलिस अधिकारी आहे त्या बळावर सुद्धा गुन्हेगारावर आपली दहशत बसवु शकतो बसवायची की नाही त्या अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो.
उपअधीक्षक कुमावत यांनी रात्री कार्यवाही केली शहरातील गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपऱ्यावर खुलेआम मटका गुटका सुरू होता पोलीस उघडपणे पान टपरी वरून गुटका विकत घेत होते त्यामुळे गुटका माफियांना कोणाचीही भीती राहिली नव्हती उप अधीक्षक कुमावत यांनी धडाकेबाज कार्यवाही करून कायदा सर्वां पेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवून दिले अशी कार्यवाही अधूमधून आंबेजोगाई पोलिसांनी केली तर पोलिसांचा गुन्हेगारांवर नक्की धाक वाढेल अन्यथा काय परिस्थिती आहे सर्वजण उघड्या डोळ्याने पाहात आहेत.

