shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदुरीकर महाराज यांचे संगमनेर मध्ये स्पष्टीकरण ..! सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी सुरूच..!!


संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):-
 किर्तनातून समाजापुढे खरे बोलणे हा एक गुन्हा झाला आहे. माझ्यावर वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी सुरूच आहे . किर्तनात एखादा शब्द चुकला की त्याचा वापर करून आपल्या चैनल ची टीआरपी वाढवली जाते.  

अशी खंत समाज प्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली आहे. देवाच्या मंदिरात इतकेच ज्ञानाच्या मंदिराला महत्त्व द्या. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करू शकतो.असे वक्तव्य करून पुढे इंदुरीकर महाराज यांनी मी लस घेतली नाही व घेणार ही नाही  असे म्हणाले.

संगमनेर मध्ये प्रतिपादन करत असतानी इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केले की मी कुठेही म्हणालो नाही मी लस घेतली नाही, तुम्ही पण घेऊ नका मी फक्त माझे वैयक्तिक मत व्यक्त केले सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात येत आहे.अशा प्रकारची खोटी बदनामी करू नये.नाही तरी देव‌ पहात असतो. याचे ही स्मरण हभप इंदूरीकर महाराजांनी करून दिले आहे.
close