shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अत्याचाराच्या घटनेने पुणे पुन्हा हादरलं ; गुरे बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१ 
पुणे : गुरे बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. गेल्या काही महिन्यात पुणे परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना वाढल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी होत आहे.
पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरे बांधत होती. त्यावेळी आरोपी तिथे अचानक गेले. त्या नंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपींनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दहा ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2021 या काळात ही घटना घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी अत्याचार व विनयभंग प्रकरणी आरोपींना तातडीने अटक केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close