शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : नगर-मनमाड रोडने मोटारसायकलवरून जाणार्या मोटारसायकल स्वारास तिघांनी चाकूचा धाक दाखवून दमदाटी करून त्याच्याकडील अकरा हजार दोनशे रुपये किमतीचा मोबाईल, रोख रक्कम व पैशाचे पाकीट असे बळजबरीने चोरून नेले.
ही घटना नगर-मनमाड रोडवरील विळद घाट येथील इंडियन पेट्रोल पंपामागे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की प्रवीण जालिंदर हापसे (वय 29, राहणार ब्राह्मणी, तालुका राहुरी) हे त्यांची मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच 17 आर 4220) मनमाड रोडने जात असताना विळद घाट येथील इंडियन पेट्रोल पंपामागे लघु शंकेकरीता थांबले असताना पाठीमागून आलेल्या
दोन अनोळखी चोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून धमकावून त्यांच्याकडील अकरा हजार रुपये रोख मोबाईल व पैशाचे पाकीट ऐवज चोरून नेले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी प्रवीण हापसे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आठरे करीत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

