shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा रुग्णालयाची पोलखोल;आगीच्या घटनेनंतर अग्नीशमन यंत्रणाच उपलब्ध नव्हती..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : जिल्हा सरकारी रुग्णालयातील ज्या अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांनी जीव गमावला आहे. त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नव्हती.  
फायर ऑडिटमध्ये ही गोष्ट रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे प्राथमीक चौकशीत समोर आलेले आहे.

जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचेच अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आलेले आहे. मात्र, हे करताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. 

कोरोना काळात आगी लागण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. त्यावेळी नगरच्याजिल्हा रुग्णालयाचेही ऑडिट करण्यात आले होते.
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी यासंबंधी पाहणी करून अहवाल दिला होता. यामध्ये पथकाने काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या.
यात आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (फायर अलार्म), आग लागलीच तर पाण्याचे फवारे फारण्याची सुविधा (स्प्रिकंलर), पाण्याचे पंप अशी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने पूर्तता करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
दुर्दैवाने ही घटना घडली आहे. या उपाययोजना तर केल्या असत्या तर यातील निरपराध जीव वाचले असते. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या सर्वांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
रिश्चंद्रे.

close