श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्रीरामपूर येथील वर्ल्ड सामनाचे संपादक प्रकाश कुलथे यांच्या मातोश्री ग.भा. छबुबाई बापूराव कुलथे यांचे आज सकाळी ६.५६ वा. वयाच्या ८० व्यां. वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले असून, दुपारी २ वाजता पुणे येथील बिबवेवाडी अप्पर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात प्रकाश कुलथे ,संजय कुलथे,बाळासाहेब कुलथे अशी तीन मुले आणी तीन मुली,जावंई सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या जाण्याने कुलथे परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. तरी कुलथे परिवाराला या दु:खातून लवकरच सावरण्याची शक्ती मिळो..! हीच "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" व "समता काॅम्प्युटर्स" परिवाराच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना..!

