shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बलप्रतीपदेच्या शुभ मुहूर्तावर हभप दुर्गाप्रसाद तिडके महाराज यांचे शुभहस्ते देवळाली प्रवरा शहरात अद्यावत व्यायामशाळेचा शुभारंभ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१
देवळाली प्रवरा :  शहरातील तरुणांना आपले शरीरसौष्ठव व बलसंर्वधनासाठी आधुनिक व्यायाम शाळा सुरु करण्यात आल्याचे प्रतीपादन हेल्फटीमचे प्रमुख दत्ता कडुपाटील यांनी केले. 
       आज बलप्रतीपदेच्या मुहुर्तावर हभप दुर्गाप्रसाद तिडके महाराज यांचे शुभहस्ते या अद्यावत व्यायामशाळेचा शुभारंभ करण्यात आला. 
      देवळाली प्रवरा शहरात तरुणांची वाढती संख्या पहाता त्यांना व्यायामासाठी अन्य गावांत जावे लागत होते. ही अडचण दुर करण्याची अनेक युवकांनी मागणी केली होती. या मागणीचा प्राध्यान्याने विचार करुन देवळाली प्रवरा शहरात सर्व सोईने युक्त अशी व्यायामशाळा सुरु करण्यात आली असुन ती सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सर्वांसाठी खुली रहाणार आहे.  
       याठिकाणी प्रशिक्षित  प्रशिक्षक नेमला असुन त्याचे देखरेखीखाली शास्त्रशुध्द मार्गदर्शन करुन युवकांना बलसाधनेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने युवकात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
    यावेळी खुल्या मैदानात असलेल्या सिंगलबार व डबल सुवीधेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडु आप्पासाहेब ढुस व जेष्ठ नागरिक शिवराम पाटील कडु यांचे हस्ते करण्यात आले. 
     प्रसंगी पत्रकार शिवाजी घाडगे , खालीद शेख ,पांडुरंग शेटे , विजय कुमावत , गीताराम बर्डे , फ्रॅन्सीस संसारे , काबंळे मामा , सागर सोनावणे , गणेश रिंगे , शंकर धोत्रें, सतीश डोळस,दत्ता कडु ,गणेश कडु आदिंसह मोठ्या संख्येने युवक हजर होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close