शिर्डी । प्रतिनिधी :-
मा. भाग्यश्री बानायत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांना नागपूर येथील संचालनालयात संचालक पदावर असताना राबविलेल्या महा रेशीम अभियानासाठी भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा स्कॉच नॅशनल अवार्ड प्राप्त झाल्याबद्दल व भारतीय जनता पार्टी अ.नगर माजी जिल्हाध्यक्ष मा. अँड. रवी काका बोरावके यांची भारत सरकारच्या भारत संचार निगम लिमिटेड (B S N L) नवी दिल्ली या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक पदावर निवड झाल्याबद्दल तसेच दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मा. श्री प्रमोद जी आहेर यांनी शिर्डी गॅझेटियर या पुस्तकाच्या माध्यमातून शिर्डी ची जुन्या काळातील माहिती शिर्डी परिसर व साई बाबांच्या माध्यमातून जगासमोर मांडली म्हणून यांचा सत्कार सावता महाराज मंदिर शिर्डी येथे भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर व भाजपा ओबीसी मोर्चा राहता तालुका अध्यक्ष स्वानंद भैय्या रासने व ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांनी केला. .

