shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कार्यकर्ताचा फोन आला आणि त्याच्या आग्रहापुढे त्यांनी हाताची सलाईन काढून ना. भरणे यांनी उद्घाटनास दर्शवली उपस्थिती.रेडणी येथील प्रतीक ट्रेंडींग कंपनी” या होलसेल किराणा व स्टेशनरीचे उद्घाटन ना. भरणे यांच्या हस्ते संपन्न.

कार्यकर्ताचा फोन आला आणि त्याच्या आग्रहापुढे त्यांनी  हाताची सलाईन काढून ना. भरणे यांनी उद्घाटनास दर्शवली उपस्थिती.

रेडणी येथील प्रतीक ट्रेंडींग कंपनी” या होलसेल किराणा व स्टेशनरीचे उद्घाटन ना. भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: गेली दोन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमासाठी झालेल्या धावपळीमुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना थोडा थकवा जाणवत असल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यांच्यावर  उपचार  सुरू असतानाच दरम्यान एका कार्यकर्ताचा फोन आला आणि त्याच्या आग्रहापुढे त्यांनी  हाताची सलाईन काढून ते 
 रेडणी येथील हर्षवर्धन दादासो बरकडे व प्रशांत दादासो बरकडे यांनी  भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्याने सुरू केलेल्या ” प्रतीक ट्रेंडींग कंपनी” या होलसेल किराणा व स्टेशनरीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती दर्शवून शनिवारी दि.६ ऑक्टोबर रोजी त्यांनी  त्याचे   उद्घाटन केले.
. कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी दत्तात्रय भरणे  यांनी स्वतःला लावलेल्या हाताची सलाईन काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली व नंतर घरी जाऊन पूर्ववत सलाईन लावून उपचार सुरू ठेवले.

सदर उद्घाटनाप्रसंगी भरणे म्हणाले की,आपल्या जवळच्या माणसासाठी थोडा त्रास झाला तरी हरकत नाही.मात्र मी आलो नसतो तर या माझ्या माणसांना खूप वाईट वाटले असते.माझा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न कायम असतो.बरकडे कुटुंब हे कष्ट करणारे कुटुंब आहे आणि त्यांनी मोठ्या कष्टातून हे उभा केले आहे.तरूणांनी या बरकडे कुटुंबाचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
close