गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्यांसाठी "हक्काचा माणूस" म्हणजेच अनिल पवार- शंकरराव माने.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, इंदापूर शहरातील सर्वांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व, अत्यंत साधी राहणीमान असणारे परंतु उच्च विचारसरणी आणि आपल्या माणुसकीच्या मुळांशी घट्ट असणारे अनिल पवार यांचा वाढदिवस होय.
आपल्या अनिल पवार यांच्या बद्दल बोलायचं झालं तर गोरगरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्यांसाठी "हक्काचा माणूस" अशीच आहे. त्यांनी केलेल्या कामाची यादी इथे द्यायची म्हटली तर बरीच मोठी यादी होईल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समाज उपयोगी कामे त्यांनी खूप केलेली आहेत. पण कधीच आपले नाव व्हावे म्हणून ही कार्ये केलेली नाहीत तर लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना त्यांचा हक्क मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून सदैव प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाची पार्शभूमीच समाजकार्याची आहे.
आदरणीय कै. बाळासाहेब पवार, सर्वांच्या आदरणीय वत्सला अक्का, विश्वनाथराव पवार मालक यांच्याकडून लोककल्याणकारी, निस्वार्थीपणे समाजकार्याचे बाळकडू आणि संस्कार अनिल पवार यांना मिळाले.आणि हाच वारसा घेऊन ते आपल्या सर्वांच्या सेवेत सदैव तत्पर असतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
आपल्या अनिल पवार यांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आहे. कोणत्याही समस्येचे समाधान त्यांच्याकडे असते हा अनुभव आपल्या सर्वांना आलेला आहे.तसेच ते स्वतः मेडिकल फिल्ड मधून ग्रॅज्युएट असून , सुशिक्षित आणि यशस्वी उद्योजक आहेत.
परंतु मेडिकल चालवत असताना कधीही त्यांनी केवळ त्यातून नफा करण्याच्या हेतूने या उद्योगाकडे पाहिलेला नाही तर अनेक गरजू लोकांना मोफत औषधे देऊन वेळोवेळी मदतही केलेली आहे. ते कधीही , कोणत्याही वेळी मदतीसाठी धावून जातात हे आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यांनी कधीही कोणत्याही कामाचे स्वतः क्रेडिट न घेता अनेक लोकांच्या अनेक अडचणी सोडवल्या आहेत, त्यातून त्यांना मार्ग काढून दिलेला आहे.
अनिल पवार यांचा हा मनमिळाऊ स्वभाव त्यांना जनमानसांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलेला आहे.अशा या आपल्या अनिल पवार यांचा आज अभिष्टचिंतन दिन आहे.
त्यांच्या अभिष्टचिंतन निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा! या निमित्त त्यांना आरोग्यदायी, लाभो आणि त्यांच्या हातून असेच सत्कर्म घडो हीच बजरंग बली चरणी प्रार्थना.
शुभेच्छुक
शंकर लक्ष्मण माने, बी. इ. मेकॅनिकल.मॅनेजर - जेसीबी इंडिया, पुणे.

