shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या कक्षाला आग, ११ रुग्णांचा मृत्यू...!!

नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात चार दिवसांपूर्वी शासकीय वाहनाला आग लागल्याची घटना घडली होती. त्या वेळी आग विझवण्यासाठी सक्षम आगरोधक यंत्रणा उपलब्ध नव्हती त्या घटनेवरून जर जिल्हा रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जन यांनी धडा घेतला असता तर आज ११ व्यक्ती चा बळी गेला नसता. आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात  सकाळीच आग लागली. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.


ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी साडेदहाच्या सुमारास अतिदक्षता विभागात ही आग लागली. या आगीत काही जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

या आगीविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं, “या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये कोव्हिडचे 17 पेशंट्स होते. या वॉर्डला सकाळी अचानक आग लागली. यामध्ये ११ पेशंट्सचा मृत्यू झालेला आहे. 1 रुग्ण गंभीर आहे.”
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असल्याचं जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितलं. या रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
स्वच्छतेसाठी तीन तास आयसीयू बंद असल्यानं आग पसरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, त्यांची चौकशी केली जाईल असंही जिल्हाधिकारी म्हणाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या याठिकाणी दाखल झाल्या होत्या. आयसीयू मोठं असल्यानं बाहेरच्या ग्रिल पूर्ण बंद असल्याने लोकांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या, असं अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी सांगितलं. ग्रिल बंद असल्याने मुख्य दरवाजातून जाऊन लोकांना बाहेर काढावं लागलं. त्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली असं मिसाळ यांनी सांगितलं. वेळीच लोकांना बाहेर काढता आलं. आयसीयूमध्ये असल्यानं ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णांना त्रास होईल याची भीती वाटत होती. पण त्यांचे प्राण वाचवणं गरजेचं असल्यानं त्यांना आधी बाहेर काढलं, असं मिसाळ यांनी सांगितलं.या आगीमध्ये अतिदक्षता विभाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

हिवरे बाजारचे उपसरपंच पोपटराव पवारही ही आग लागली त्यांच वेळी नेमके या हॉस्पिटलमध्ये होते. मिडिया प्रतिनिधींशी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, “”पद्मश्री पुरस्काराच्या वितरणासाठी मी 8 तारखेला दिल्लीला जाणार आहे. त्या कार्यक्रमाला जायच्या आधी कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी सकाळी 9.30 वाजता जिल्हा रुग्णालयात गेलो होतो. सिव्हिल सर्जन यांच्यासोबत असताना आयसीयूला आग लागल्याचे कळाले. तातडीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री आणि इतर यंत्रणांना कळवले. काही वेळातच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. आयसीयुच्या बाहेर असणाऱ्या बोर्डमध्ये शॉक सर्किट होऊन आग लागली असण्याची शक्यता आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना बाहेर असलेल्या कार चालकाने सर्वात आधी आग लागल्याची आम्हाला माहिती दिली.

या ठिकाणी आगीत होरपळून मृत्यू व्यक्ती नावे  सिताराम दगडु जाधव बख्तापुर शेवगाव, 
भिवाजी सदाशिव पवार किन्ही पारनेर,
 रामकिसन विठ्ठल हरपुडे माका नेवासा ,
कोंडाबाई मधुकर कदम केडगाव ता.नगर , 
छबाबी अहमद सय्यद शेंडी ता.नगर, सत्यभामा शिवाजी घौडचौरे तेलकुडगाव नेवासा, कडुबाळ गंगाधरा खाटीक पाथरवाला नेवासा, आसराबाई गोविंद नांगरे शेवगाव ता.शेवगाव, दिपक विश्वनाथ जगदाळे अश्वी संगमनेर,  
एका इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. एक रुग्ण अंत्यत गंभीर जखमी आहे.

    
घटनास्थळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,नगर शहरांचे आमदार संग्राम जगताप, युवा नेते अभिषेक कळमकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे,  जेष्ठ समाजसेवक जालिंदर बोरुडे, जनाधार अध्यक्ष प्रकाश पोटे, माणिक विधाते, अहमदनगर पोलिस,  आदी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.या  वेळ  रुग्णांचे नातेवाईक आक्रमक झाले होते.
close