shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालातल्या माणसांची दिवाळी झाली गोड..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
'मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, दीप लावू अनाथांच्या उशाला रोज राती  झोपताना" या ओळी  सार्थ करत केज येथील संवेदनशील शिक्षकांनी केज बीड रस्त्यालगतच्या पालात हलाकीचं जीवन जगणाऱ्या तीस कुटुंबांना फराळाचे साहित्य वाटप केले.सहभागातून दिवाळी गोड केल्याने कुटुंबांनी आनंद व्यक्त केला.


शिक्षक ग्रुपने गुरुवार रोजी निधी एकत्र करून सर्व गोड पदार्थ पॅकिंग करून प्रति कुटंबास भेट दिले.यावेळी पालात लहान मुलांच्या हस्ते पणती चा उजेड केला.जी बी गदळे,हनुमंत घाडगे, युवराज हिरवे,व्ही एम यादव,प्रा डॉ बाबासाहेब हिरवे,हनुमंत भोसले,किशोर भालेराव,महादेव ढाकणे,राहुल काकनाळे,विक्रम डोईफोडे जनार्धन सोनवणे, प्रा डॉ काशीद,डॉ हनुमंत सौदागर आदींनी सहभागी होऊन आपल्या माणसांची दिवाळी गोड केली. 

कुटुंबातील लहान बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
close