shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनता दर पाच वर्षाला वॉर्डाचा नगरसेवक निवडते..!निवडून आल्यानंतर नगरसेवक गुत्तेदार का बनतात?

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                 शहरातील प्रत्येक वॉर्डातील नागरिक समस्या नगरपंचायत प्रशासनासमोर मांडण्यासाठी नगरपंचायत मध्ये येऊ शकत नाही. त्यासाठी जनतेच्या सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वार्डातील मतदार दर पाच वर्षाला निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारातून पात्र उमेदवाराला दर पाच वर्षासाठी नगरसेवक म्हणून निवडून देतात निवडून आलेल्या नगरसेवकांनी जनतेची सेवा करावी हा सर्वसामान्य जनतेचा उद्देश असतो मात्र होते नेमके उलटे . निवडून आलेले नगरसेवक वार्डातील कामाचे गुत्तेदार बनतात याला अपवाद कांही नगरसेवक आहेत वॉर्डाच्या समस्या सोडवायच्या कोणी ? असा प्रश्न प्रत्येक वॉर्डातील जनतेसमोर निर्माण झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
    
           
केज नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पाच वर्षांपूर्वी झाली आहे. यात पन्नास टक्के महिला आरक्षण असल्याने ९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. कोणतेही क्षेत्र असो पुरुषांपेक्षा महिला आपले कर्तव्य पार पाडण्यात अग्रेसर ठरतात मात्र पुरुष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना वार्डातील समस्या असो अथवा समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाशी थेट संपर्क करायचा असेल तर महिला लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणली जाते. यात कोणीही मागे नाही काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , भाजप एक समान आहेत . निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना नगरपंचायतीच्या विविध सभांना उपस्थिती लावायची असते. धोरणात्मक भूमिका पतीदेव अथवा इतर नातेवाईक बैठकीच्या एक दिवस अगोदरच घेतात. त्यामुळे सभागृहात महिला लोकप्रतिनिधी फक्त  उपस्थिती दर्शवावी एवढीच त्यांची जबाबदारी शिल्लक राहिली आहे. 
                     
नगरपंचायतीच्या वतीने शहरातील वार्डात विविध विकास कामे केली जातात पूर्वी ही कामे गुत्तेदार करायचे त्यावेळी कामाचा दर्जा चांगला व्हावा यासाठी नगरसेवक लक्ष ठेवत होते . हळूहळू निवडून येण्याचा पॅटर्न बदलला वार्डात निवडून यायचे म्हणजे कमाई करण्यासाठी असा अलिखित नियम बनला नगरपंचायतीच्या विविध विकास कामांची निविदा फक्त गुत्तेदार याच्या नावाने भरल्या जातात कामे नगरसेवकच करतात अशी शहरातील जनता खुलेआम चर्चा करते. कारण कामावर मटेरियल आणून टाकण्यापासून मजुरांकडून काम नगरसेवकच स्वतः उभे राहून करून घेत असल्याने त्यात चुकीचे आहे असे कोणालाच वाटत नाही हे सर्वच पक्षाचे नगरसेवक करतात अशी चर्चा होत आहे. 
            
नगरसेवकाचा गुत्तेदार बनला सर्वात प्रथम या बदलाचा विरोध वार्डातील मतदारांनी करावयास हवा असतो तिथे कोणीही पुढे येत नाही हे नगरसेवकाला नक्की माहीत असते . सर्वात जास्त नुकसान त्या वार्डातील जनतेचे होते त्याचे कारण म्हणजे वार्डातील कामाचा गुत्तेदार नगरसेवक असल्याने नगरपंचायतीचे  अभियंता कामाचा दर्जा कसा तपासणार ? कोणीही तिकडे फिरकत नाही त्यामुळे नगरसेवकांनी वॉर्डात केलेली कामाचा दर्जा काय ?  प्रत्येक वार्डातील मतदारांनी स्वतः तपासणी केली तर हे लक्षात येईल. विकास कामे तसेच स्वच्छते सह इतर कामाचाही बोजवारा उडालेला दिसतो. प्रत्येक वॉर्डातील नाल्या आजही तुंबलेल्या आहेत. नगरसेवक स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराला विचारू शकत नाही  का ? हा प्रश्न कोणीही विचारू शकत नाही याचे उत्तर नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही माहित आहे. 
              
आतापर्यंत काय झाले प्रत्येक वॉर्डातील जनतेने प्रत्येक नगरसेवकाच्या कामकाजाचे मूल्यमापन करावे . अलीकडे केजचे नगराध्यक्षा आदित्य पाटील यांनी कालावधी समाप्त होत असताना दोन कोटीच्या जवळपास विकास कामे करण्यासाठी निधी आणला होता. एकुण निधी ३कोटी ७५ लाख रुपये होता .त्यातील जवळपास १कोटी ७५ लाख रुपयांची कामे रद्द झाली आहेत.त्याला कारण म्हणजे कामा पेक्षा कमी बीलोने टेंडर भरले होते व गुत्तेदाराने कामाच्या गुणवत्तेची हमी न दिल्याने प्रशासनाने सदरील कामे रद्द केले आहेत.प्रत्येक वार्डात विकास कामे सुरू होते त्या कामावर देखरेख करताना नगरसेवक आहेत चालू कामाचे अंदाजपत्रक किती ,काम किती लाखाचे किती सिमेंट लोखंड वापरत आहेत कामाचा दर्जा काय शेवटच्या टप्प्यात जनतेने नगरसेवकाच्या कामकाजाचे मूल्यमापन केले तर जनतेच्याही लक्षात येईल नगरसेवक निवडणुकीत एवढा पैसा कशाच्या भरवशावर खर्च करतात. उमेदवार पाच वर्षात खर्च किती करतात व कमाई किती करतात सर्वसामान्य जनतेलाही समजेल. कोणत्याही नगरसेवकांना विचारा सतत त्यांचे एकच म्हणणे असते रुपयाचे काम नाही वार्ड कसा सांभाळायचा ? वार्ड सांभाळण्यासाठी खर्च येतो का ?  हे नगरसेवकांच्या तोंडी  कळते  त्यामुळे भावी नगरसेवक कोण व कसा निवडायचा हे मतदारांनी  ठरवावे !!.
close