shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज भाऊ बीज आहे..!


असतो संसार तिचा तरीही,
साद घालते माया!
डोळे लावते वाटेवर ती,
येईल भाऊ राया!!

सहृदयी भाऊच जाणो,
बहिणीचे प्रेम काय चीज आहे!
प्रेमाने ओटी भरा भावांनो,
आज भाऊ बीज आहे!!

असो भाऊ तालेवार तो,
कमवा वो मालमत्ता!
बहिणीला हवी बंधू भेट,
त्याच्या भेटीवर तिची खरी सत्ता!

नाही आशा संपत्तीची,
फक्त भेटीची अपेक्षा तिज आहे!
प्रेमाने भेट घ्या भावांनो,
अरे आज भाऊ बीज आहे!!


 राजेंद्र नारायणे
 9850608131
close