shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिव्हील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत झालेल्या मृत्युला सिव्हील सर्जन जबाबदार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१ 
नगर : जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणत आग लागून जवळपास दहा रुग्ण मृत्यूमुखी पडले आहे. या घटमेला जबाबदार धरून जिल्हा शल्यचिकित्सक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दी पत्रकात भुतारे यांनी म्हटले आहे की, मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या. त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते. तरी सुद्धा अहमदनगरची शासकीय अधिकारी गहाळ राहिले.

या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे का नाहि , झाले असेल तर दर सहा महिन्याला फायर यंत्र सुरळीत चालतात का नाही याची खात्री करून घेतली गेली पाहिजे होती. इलेक्ट्रिक यंत्रणा सुरळीत आहे का नाही त्याचे ऑडिट सुध्दा वारंवार करणे गरजेचे होते. परंतु असे काही झालेले दिसत नाही. 
मागच्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जन यांच्या वाहनाला हॉस्पिटलच्या आवारात पार्किंग मध्ये आग लागली होती. इतके झाले तरी बारीक लक्ष ठेवत काळजी घेणे गरजेचे होते. परंतु असे काही झाले नाही. 

दोन दिवसानंतर आज सिव्हील हॉस्पिटलच्या आयसीयू विभागाला आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकाराला दोन दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलच्या आवारात पार्कींग मध्ये गाडीला आग लागून सुध्दा व्यवस्थित चौकशी केली गेली नसल्यामुळे सिव्हील सर्जन डॉ पोखरणांच्या हलगर्जपणामुळे हा प्रकार झाला आहे. त्यामुळे त्यांना सर्वस्वी प्रकरणाला सिव्हील सर्जन डॉक्टर पोखरणा हेच जबाबदार आहेत. 

त्यामुळे त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक या पदावरून बडतर्फ करावे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी गृहमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे. तसेच झोपलेल्या पालकमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close