shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“मी लस घेतली नाही,घेणारही नाही”, इंदुरीकर महाराजांच वादग्रस्त वक्तव्य..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर , २०२१ 
नाशिक : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. आपल्या हटके स्टाईलने इंदुरीकर भल्याभल्यांना हसवतात. आणि म्हणून इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. काही जण इंदुरीकरांनी दिलेल्या भावनिक संदेशचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवतात. तर काही इंदुरकरांनी मारलेले टोमणे हे सतत शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर सतत चर्चा होत असते. यादरम्यान इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातला नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.  या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणावर  भाष्य केलं आहे. तसेच आपण लस घेतली नाही आणि घेणारही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
“ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळी फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असतानाच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे सार्वजनिकपणे नागरिकांना सांगत आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या या विधानावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी इंदुरीकर महाराज कीर्तनामुळे अडचणीत
दरम्यान, याआधी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close