shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अक्षय कर्डिलेच्या हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर , २०२१ 
नगर :  खंडाळा (ता. नगर) शिवारात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पाच जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जब्बाद रहिमखो पठाण यांनी फिर्याद दिली आहे. 
या प्रकरणी अक्षय अनिल कर्डिले (वय 25), सौरभ अनिल कर्डिले (वय 21), संदीप पंडित जाधव (वय 23, सर्व रा. खंडाळा, ता.जि. अहमदनगर), विकी मनोहरलाल शर्मा (वय 29, रा. आझादनगर, ता. जि. अहमदनगर) आणि गणेश मनोहर लाड (वय 21, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 
आरोपी अक्षय कर्डिले याच्या मालकीचे हॉटेल राजयोग असून त्याठिकाणी आरोपी कुंटणखाना चालवत होते. मंगळवारी सायंकाळी नगर तालुका पोलिसांनी खंडाळा गावच्या शिवारातील हॉटेल राजयोग येथे छापा टाकला.
आरोपी हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता महिला व मुलींना देह विक्री करण्यासाठी बोलवून घेत. त्या महिला व मुलींकडून गैरमार्गाने देहविक्री करून कुंटणखाना चालवत होते. 
पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे व पाचही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल करत आहेत.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close