जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७
साेलापुर: अभिनेत्री कंगना राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्याच्या विरोधात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार कु.प्रणितीताई शिंदे व सोलापूर शहर काॅग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध करुन जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तसेच अभिनेत्री कंगना राणावत च्याफोटोची होळी करुन कंगना राणावत व केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परीसर दणाणून सोडला होता.
यावेळी बोलताना शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर म्हणाल्या की, "एक विकृत बुद्धीची दिडदमडीची नटी अन्नदात्या शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधते, महाराष्ट्राची शान असणा-या मुंबई सारख्या शहराला मिनी पाकिस्तान म्हणते आणि आता तर समस्त राष्ट्रीय नेते आणि भारतीयांनी प्रचंड संघर्ष करून, गोळ्या झेलून, तूरूंगवास भोगून, लाठ्या काठ्या खावून मिळविलेल्या स्वातंत्र्याला भिक म्हणते.... ही विकृती आली कुठून ? हिच्या मुखातून कोणाचे विचार बाहेर पडत आहेत ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
या विकृत बाईला नुकताच आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा अवमान थांबलाच पाहिजे. या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ताबडतोब तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा हेच गरजेचं आहे. केंद्र सरकारनं हे ऐवढं तरी करावं अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. देशभक्तीचे नारे देऊन, भारतमातेच्या घोषणा देऊन, महापुरूषांचा वारसा आम्ही चालवतो असे म्हणणारे, उठता बसता वंदे मातरम् म्हणणारे भाजपवाले आता या देशाच्या स्वातंत्र्याचा असा अपमान होताना कुठं दडून बसले आहेत ? याबद्दल मोदीजी का कांहीच बोलत नाहीत, अमित शहा का कांहीच स्टेटमेंट देत नाही दोघेही तोंड बंद करून बसले आहेत.
मोदीजी, आता तुम्हाला १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला लाल किल्यावरून देशाला संबोधित करायचा नैतिक अधिकार अबाधीत ठेवायचा असेल तर कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार काठून घ्या. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा व तिच्या वर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. तसेच या संतप्त भावनेचे निवेदन मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी म.प्रदेश महिला सचिवा सुमन जाधव, माजी अध्यक्षा ॲड. करिमुन्निसा बागवान, मुमताज तांबोळी, सुनिता बेरा, चंदा काळे, मिना गायकवाड, अनिता भालेराव, अंबुबाई जाधव, पुनम जाधव प्रभावती जाधव सुरेखा चव्हाण, सत्यभामा गायकवाड, गिरजा काळे, रजिया अन्सारी, श्वेता काळे, कुसूम चव्हाण, पद्मा मटाला, बायडाबाई शिंदे, मारिया शेख आकाश बेरा, सचिन गायकवाड आदी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

