औरंगाबाद । प्रतिनिधी(सतिश लोखंडे):- बळीराम पाटील हायस्कूल चौक, सिडको एन.९ औरंगाबाद येथे क्रांतीगुरू लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती साजरी करण्यात आली.
मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रमेश सुर्यवंशी यांच्या हस्ते वीर लहुजी वस्ताद साळवे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी राम हनवते विधीतज्ञ, संतोष साठे शहर संघटक, रोहीदास आस्वार ता अध्यक्ष औरंगाबाद ,आजिनाथ पाचवणे शहराध्यक्ष मध्य , कृष्णा महाले , .शहर संघटक, सचिव मध्ये , संतोष जाधव साहेब,वैभव थोरात,आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

