shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दंगली आणि भविष्य...! ज्या कोणी भडकवली माथी,त्याने तर आपले इप्सित साध्य केले ! मात्र जरासा विचार करा, शिक्षण/नोकरीचे वाटोळे कोणाचे झाले ?



श्रीरामपूर । प्रतिनिधी :
काही कपाळ करंटे संधी साधू नितिभ्रष्ट राजकीय नेते आपली राजकीय दुकानदारी चालावी म्हणून सोशल मिडिया / प्रसार माध्यमांद्वारे आगदी आरामात आपापल्या घरी सुरक्षित बसून जाती-पातीच्या नावांखाली तरुणांची माथी भडकवितात आणि भडकलेली तरुणांची माथी रस्त्यावर उतरुन हैदोस घालतात, दंगली करतात,मारहाण करतात,जाळपोळ करतात आपल्याच हाताने आपल्या आयुष्याची राख रांगोळी करुन घेतात, मग भडकलेली जेव्हा ही मंडळी रस्त्यावर धुडगूस घालत असतात त्यावेळी कुठेना कुठे व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रिकरण झालेले असते.त्या चित्रीकरणा आधारे मग पोलिस य़ंत्रणा एकाएकाला शोधून काढते आणि त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल करते.

यामुळे या माथे भडकलेल्या तरुणांचे शिक्षण तर बोंबलतेच शिवाय शिक्षण बोंबलल्याने त्यांच्या नोकऱ्याही बोंबलल्या जातात. मग यांच्या रिक्त जागेवर कोणास नोकऱ्या मिळतात बरे ?


याचे उत्तर ज्यांनी या तरुणांची माथी भडकवून दंगली करण्यास यांना भाग पाडलेले असते,त्यांच्या मुला-बाळांना/नातेवाईकांना/अथवा त्यांनाच मिळतात, मात्र यात माथे भडकवणाऱ्यांचा तसा काय दोष ?,ते तर त्यांचे मुलं बाळं नातेवाईक आणि जातभाईंसाठीच हे सर्व करत असतात,मात्र ज्यांचं गुन्ह्यात अडकल्यामुळे न्यायालयाच्या फेऱ्या आणि तुरुंगवारी करण्यात शिक्षण बोंबललं आणि शिक्षणच बोंबललं तर नोकऱ्याही बोंबलल्या हे जेव्हा या बिन आकली माथ्यांच्या लक्षात येईल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल,कारण घरात बसून माथी भडकविणाऱ्या एकाही बहादराच्या घरचे या दंगली करायला कोणीच पुढे येत नाही, कारण त्यांना उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर नोकऱ्या करायच्या असतात, मिळणाऱ्या नोकरीच्या गडगंज पगारातून ऐशो आरामात रहायाचे असते,सुट्टीत परदेश वाऱ्या करायच्या असत्या,आपल्या पोऱ्हांनी कधी महाबळेश्वर/भंडारदऱ्याला ट्रिप काढली नाही,कारण खिश्यात खडकू नसतो,खायाचे वांदे तीथं काय ट्रिप काढणार ?,

अशा प्रकारे आपल्या तरुण मुलांची जाती-पातीच्या देवा- धर्माच्या नावाने दंगली घडवून आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे त्यांचे शिक्षण बोंबले जाते आणि शिक्षणच जर बोंबले तर मग नोकऱ्या तरी मिळणार कशा ?
याचा सर्वच बहूजन समाजातील तरुणांनी विचार करणे गरजेचे बनले आहे.
close