shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व तंटामुक्ती शिबीर..!


बेलापूर । प्रतिनिधी :-
दैनंदिन जीवन जगतांना रोजच्या व्यवहारात क्षणोक्षणी कायद्याचा संबंध येतो त्यासाठी प्रत्येक नागरिकांना कायद्याचे प्राथमिक ज्ञान असल्यास दैनंदिन व्यवहारात अडचणी दुर करण्यास मदत होईल त्यामुळे न्यायालयीन खटले कमी होण्यास आवश्य मदत मिळेल असे मत यावेळी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड डॉ विक्रांत वाघचौरे यांचे सह अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स व प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व तंटामुक्ती शिबीर संस्कृती मंगल कार्यालय मौजे बेलापूर ता श्रीरामपुर येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सूत्रसंचालन मा श्री कमलाकर कसबे सर यांनी केले, प्रस्थाविक मा श्री कैलास बनसोडे सर यांनी केले , त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय सुचना मा श्री एकनाथराव नागले यांनी मांडली त्यास अनुमोदन मा श्री विशालभाऊ नागले यांनी दिले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अशोक नाना साळुंके यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाचे उदघाटक
 सुव्वालालजी लुक्कड, विष्णुपंत डावरे व देविदास देसाई यांचे हस्ते श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले
प्रतिमा पूजन , दीप प्रज्वलन करून भारतातील तेली समाजाचे इतिहासातील पहिल्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व तंटामुक्ती शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी  ॲड.विजय साळुंके, ॲड विक्रांत वाघचौरे, ॲड अमित महाले, देविदास कहाणे, बद्रीनाथ लोखंडे, सौ शारदाताई कर्पे यांनी कौटुंबिक समस्या., शेती विषयक / प्रॉपर्टी विषयक तंटे,कायद्याची माहिती तसेच 7/12 /स्थावर मालमत्ता विषयी माहिती, महीला भगिनींना महिला हक्काच्या कायदयाविषयी माहिती, बालविवाह व लव जिहाद यासारख्या प्रकरणांवर जनजागृती, चेक बाऊन्स / बँकेच्या कर्ज प्रकरणी माहिती, मोटार अपघात व फौजदारी कायदयविषयी माहिती, ग्राहक संरक्षण व कामगार कल्याण कायदा यावर मार्गदर्शन असे अनेक विषयांवर संदर्भात माहिती दिली, यासाठी अहमदनगर जिल्हा तेली समाज परिसंवाद यात्राच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी अनेक तक्रारदार यांनी आपल्या व्यक्तिगत तक्रारी मांडल्या यावर उपस्थित वकील मंडळाकडून समाधानकारक मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गुणवंत विध्यार्थी व विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवून तेली समाजाचे आदर्श निर्माण केलेल्या समाज बांधवांचा व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बेलापूर येथील अपंग निराधार महिलेस कृत्रिम फूडवेअर याची सोय मा सौ प्रमिलाताई घोडके यांनी केली, मा श्री अशोक नाना साळुंके व मा श्री सुव्वालालजी लुक्कड यांचे तर्फे दर महिन्याला एक हजार रुपये किराणा खर्च व अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा च्या वतीने मोठी आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शरदराव नवले जिल्हा परिषद सदस्य, महेंद्र साळवी सरपंच बेलापूर ग्रामपंचायत, अभिषेक खंडागळे,उपसरपंच बेलापूर ग्रामपंचायत, अरुण पाटील नाईक,पं.समिती सदस्य,   सुधीर नवले मार्केट यार्ड कमिटी सदस्य, रविंद्र खटोड, ग्रामपंचायत सदस्य, भरत साळुंके , ग्रामपंचायत सदस्य, पुरुषोत्तम भराडे, तंटामुक्ती अध्यक्ष, अशोक प्रधान, पोलिस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मा सौ शारदाताई कर्पे,मा श्री राजेश लुटे, एकनाथराव नागले, बद्रीनाथ लोखंडे, सौ प्रमिला घोडके, कैलास बनसोडे,  सौ तारकेश्वरी वालझाडे मा ॲड विजय साळुंके, देविदास कहाणे, अनिल जाधव, विशाल नागले, सागर ढवळे,  सौ वैशाली लुटे, यांचे सह मोठ्या संख्येने तेली समाज बांधव व बेलापूर शहर ग्रामस्थ तसेच पत्रकार उपस्थित होते.
close