shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!



शिवप्रेमींच्या मुकुटामधला, 
मणीच निखळून गेला
असंख्य चाहते कोंदण ज्याचे
हिराच तो निखळला !!१!!

वक्तृत्वाचा अमोघ सागर
स्तब्धची हो झाला
शिवप्रेमींच्या हृदयाचा हो
ठोकाची चूकला!!२!!

खेडोपाडी फिरोनी ज्यांनी
शिव जागरण केले 
छत्रपतींचे आदर्श सांगत
जीवन हो अर्पिले!!३!!

शिवशाहीर तुम्ही, छत्रपतींचे 
पाईक हो झाला
इतिहास हा शिव-शंभुचा
जागृत तुम्ही केला!!४!!

शिवप्रेमींना आज तुम्ही हो
हुलकावणी दिधली
निरोप ऐकूनी शिवप्रेमींची
हृदये आक्रंदिली!!४!!

मनामनाला सदैव ज्यांनी
शिवमयची केले
राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूनी
देशभक्त केले!!४!!

इतिहासाचा शोध घेऊनी 
शस्त्रे ही जमविली
शिवप्रभूंची उदंड ख्याती
मनोमनी रूजविली!!५!!

बाबासाहेब देवाघरी तुम्ही 
कृतार्थ होऊनी गेला
संस्कृती आणि इतिहासातून
अजरामर झाला!!६!!

आठवणीतून, कर्तृत्वातून
दिगंत आपली कीर्ती
राष्ट्रहितास्तव जगला आपण,
पावन केली धरती!!७!!

अधिकारी तुम्ही मोक्षप्राप्तीचे
कर्तृत्वाची मूर्ती महान 
सदैव आपल्या श्वासामधुनी
उमटत होते शिव गुणगान !!८!!

मुजरा करतो कर्तृत्वाला
चंद्रकांत मी शिवप्रेमी
बाबासाहेब आपण केली
धन्य धन्य ही शिवभूमी!!९!!

मुक्या मनाची, हृदयापासून 
श्रद्धांजली अर्पितो
बाबासाहेब आम्ही आपुल्या.
चरणी लीन होतो!!१०!!

रचनाकार : चंद्रकांत शहासने 
(देशभक्तकोशकार) 
मोबाईल : ९८८१३७३५८५
close