shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लटकुची साडेसाती सोनई परिसराला लागलेले ग्रहण..! पोलीसांचा अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सामान्य माणसाचा जिवाला धोका...!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूरला गर्दी तशी वाढते तशी लटकुची संख्या वाढत आहे. हा एक चिंतेचा विषय आहे, रस्त्यांचे काम जरी अर्थवट झाले असले तरी ज्या ठिकाणी रस्त्याचे काम झाले आहे. त्या ठिकाणी हे लटकु सुसाट वेगाने दुचाकी दामटत असतात. दोन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी  यांच्या अर्थपूर्ण तडजोडी मुळे यांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतच चालली आहे हा एक चिंतेचा विषय बनला आहेे. मागील पधरवाडयात झालेल्या शांतता बैठकीत शेवगाव विभागांचे उप अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या बैठकित दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना लटकुंचा बंदोबस्त करण्याचा आदेश जाहीर भाषणातुन दिला होोता. मात्र त्याचा काहीच फरक या दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीच फरक झालेला नाही.

या आदेशा नंतर आळा बसण्याऐवजी लटकुची संख्या वाढत आहे. शनिदेवाला साडेसाती निवारण करणारी ग्रह दैवता मानले जाते परराज्यातुन येणारया भाविकांना या लटकुची साडेसाती मुकाट्याने सहन करावी लागत आहे यांचे एकमेव कारण म्हणजे येथील येथील पोलीसांचा ढिसाळ कारभार हेंच म्हणावे लागेल. आता यात जिल्हा पोलिस अधीक्षक 
यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. या लटकुंच्या त्रासाला येथील नागरिक कंटाळले आहेत.

या दोन्ही पोलीस ठाण्यात शिस्त प्रिय अधिकारी नेमण्याची मागणी वाढत आहे. नाहीतर कांहीं दिवस कमी होणारी लटकुची संख्या दुपटीने वाढत जाते. यातुन अपघात झाले आहेत आणि होत आहेत.

यापुर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना अपंगत्व आले आहे. या लटकुंना राजाश्रय कुणाचा हा मोठा प्रश्न आहे. जरी पोलीसांनी या लटकु वर कारवाई केली तरी फोन आल्या नंतर यांवर कारवाई होण्याऐवजी त्याला सोडावे लागते ही दुर्दैवाची शोकांतिका आहे. त्यामुळे लटकुंची संख्या कमी होण्या ऐवजी वाढतं आहे. सोनई परिसराला लागलेले हे लटकुंचे साडेसातीचे ग्रहण कधी सुटणार हे देवच जाणोो.?. गुरुवारी दुपारी सामाजिक कार्यकर्ते व सोनई ग्रामपंचायत सदस्य नितीन प्रभाकर दरंदले यांना एका लटकुनी जोराची धडक दिल्याने दरदले गंभीर जख्मी झाले आहेत. त्यांच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेेत. परिसरात पोलीसांचा भुमिके विषयी नाराजीचा सूर ऐकवयास मिळत आहे या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मोठ्या प्रमाणात सुरू असुन पोलीस यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत अवैध प्रवाशी वाहतूक एस टी चा संपामुळे जनावरा प्रमाणे यात प्रवाशी भरले जात त्यातुन काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलीस उप अधीक्षकच्या आदेशाला केरची टोपली 
पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी लटकू बाबत सोनई शिंगणापूर पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देऊनही कारवाई मात्र शुन्य याबाबत जर पोलिसाने कारवाई करून लटकू हद्दपार केले नाही तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही
मोहन शेगर, सामाजिक कार्यकर्ता 
                 

पोलीस थातुर मातुर कारवाई करुन पैसे घेऊन लटकुना सोडतात...!      
                  

संदिपदादा अशोकराव कुुुुुुसळकर

सोनई अणि शिंगणापूर पोलीस कडक कारवाई करत नसल्याने अनेकाना आपला जीव गमवावा लागला आहे शिंगणापूर पोलीसा समोरच लटकु भाविकांना त्रास देतात पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.            
संदिपदादा कुसळकर.                 
माजी उपसरपंच सोनई ग्रामपंचायत.
close