shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई संचलीत महाराष्ट्र राज्य पञकार संघ केज तालुका कार्यकारीणी जाहीर..!!



केज तालुकाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्षपदी प्रकाश मुंडे उपाध्यक्ष महादेव दळवे तर सचिव पदी सचिन साखरे यांची निवड..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :


महाराष्ट्र राज्य पञकार संघ ,मुंबई संचलीत केज तालुका पञकार संघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असुन महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या केज तालुकाध्यक्षपदी दैनिक राजयोगचे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्षपदी प्रकाश मुंडे उपाध्यक्ष पदी महादेव दळवे तर सचिव पदावर सचीन धनराज साखरे यांची निवड करण्यात आली आहे.


याबाबत सवीस्तर वृत असे की, महाराष्ट्र राज्य पञकार संघ मुंबई मा.वसंतजी मुंडे,प्रदेश संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभवजी स्वामी, मार्गदर्शक संतोषजी मानुरकर यांच्या मार्गदर्शनानुसार केज तालुक्यातील पञकारांची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच होऊन केज तालुका कार्यकारीणीची निवड करण्यात आली.


महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या केज तालुकाध्यक्ष पदावर दैनिक राजयोगचे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्ष पदी दैनिक शिर्डी एक्सप्रेसचे जिल्हा प्रतिनिधि प्रकाश मुंडे, उपाध्यक्षपदी दैनिक बाळकडुचे जिल्हा प्रतिनिधी महादेव दळवे,सचीवपदी दैनिक परळीवार्ता न्युजचे प्रतिनिधी सचिन साखरे,सहसचीवपदी दैनिक राजयोगचे प्रतिनिधी दिपक साखरे, कार्याध्यक्षपदी दैनिक शिर्डी एक्सप्रेसचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे, तर कोषाध्यक्षपदी दैनिक झुंजारनेता प्रतिनिधी बळीराम भोसले, कायदेशीर सल्लागार पदावर अॕड.युवराज फुन्ने तर सदस्य पदावर दैनिक अक्षराजचे जिल्हा प्रतिनिधी रमेश गुळभिले यांची निवड करण्यात आली आहे.

मा.वसंतजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील पञकार बांधवांसाठी विवीध उपक्रमाचे आयोजन करुन सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभे राहुन समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य पञकार संघाची केज शाखा प्रयत्नशील राहणार  अशी प्रतिक्रिया केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व कार्याध्यक्ष प्रकाश मुंडे यांनी दिली.          

तसेच नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मराठवाडा स्तरीय होत असलेल्या पहील्या अधिवेशनाला येण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
close