shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाशिकच्या अँटी करप्शन टीमने श्रीरामपुरात पोलिसाला रंगेहाथ पकडले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१

 श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरामध्ये आज शनिवारी सकाळच्या सुमारास नाशिकच्या अँटी करप्शन पथकाने एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक श्री.दुधाडे यांना लाच स्विकारतांना रंगेहात पकडले आहे.
     
   याबाबत सुत्रांकडुन समजलेली अधिक माहिती अशी की,दुधाडे यांच्याकडे तपासासाठी असलेल्या अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एका तक्रारदाराला तीस हजार रुपयांची लाच मागितली होती.तडजोडीअंती दहा हजार रुपये दुधाडे यांनी आज दि.२७ रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वीकारले.त्याचवेळी नाशिकच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

        नाशिक अँटी करप्शन विभागाचे प्रमुख/SP श्री.सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.सध्या दुधाडे यांची नाशिकचा पथकाकडून चौकशी चालू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ते करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 



 

close