shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर ब्रेकिंग: तीन एसटी बसेसवर दगडफेक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१

शेवगाव : मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरु आहे. हा संप बराचसा चिघळला.परंतु आता सरकारने अनेक मागण्या मान्य केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी हा संप मागे घेऊन कामकाज सुरु झाले . 

अहमदनगरमधील शेवगाव आगारातील बसेस सुरु झाल्या होत्या.परंतु लगेचच याला गालबोट लागले. शुक्रवारी पैठण, शनिवारी सकाळी अहमदनगर व श्रीरामपुर कडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसेसवर अज्ञात ईसमाकडून दगडफेक करण्यात आली.असून या प्रकारामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील सौंदाळा परिसरातील हॉटेल जयराजश्री जवळ आज (दि.27 नोव्हेंबर) सकाळी ९:३० सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.शेवगाव डेपोची बस क्रमांक एम एच ४० एन ८८९५ या बसवर दगडफेक करण्यात आली. यात बस चालकाच्या बाजूची पुढची एक काच फुटली आहे.ही बस शेवगाव कडून नेवासाकडे जात असताना ही घटना घडली. दगडफेक करणारे पसार झाले आहेत.विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता.मात्र, शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. शेवगाव कडून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० वाय ५४२८ या गाडीवर अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे.श्रीरामपुर कडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ वर सौंदळा ( भेंडा नेवासा), तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close