शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१
पारनेर : आदर्शगाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना मंगळवारी नवीदिल्लीत पद्मश्री पुरस्काराने सन्मातीत करण्यात आल्यानंतर तेथून परतताना पारनेर शहरात त्यांचे मोेठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार नीलेश लंके यांनी स्वतः पुढाकार घेत या स्वागताची तयारी केली होती. छोलताशे, फटाक्यांची आताषबाजी तसेच शुभेच्छांच्या वर्षावाने पोपटराव पवार व त्यांचे कुटूंबिय भारावून गेले.
दिल्लीहून विमानाने राज्यात परतल्यानंतर सकाळी वाडेगव्हाण फाटा येथे आ. नीलेश लंके यांनी त्यांचे स्वागत केले. पारनेरकडे येताना राळेगणसिध्दीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चरणी नतमस्तक होत पोपटारावांनी हजारे यांचे आशिर्वाद घेतले. राळेगणसिध्दी परीवाराच्या वतीनेही त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारे यांनी पवार यांचे पुरस्कार मिळाल्याबददल अभिनंदन केले.
राळेगणसिध्दीवरून पारनेर येथे पोहचल्यानंतर हिंद चौकात फटाक्यांची आताषबाजी करीत पवार यांचे स्वागत करण्यात आले. आ. नीलेश लंके यांच्या वतीनेे पवार तसेच त्यांच्या पत्नीचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. पुढे त्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
अॅड. राहूल झावरे, विजय औटी, संदीप चौधरी, डॉ. बाळासाहेब कावरे, गणेश कावरे, श्रीकांत चौरे आदींनी मिरवूणकीचे नियोजन केले. मिरवणूकीदरम्यान अनेक नागरीकांना पवार यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. नागेश्वर गल्लीत नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने पवारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. आर. जी. सय्यद यांच्या आनंद हॉस्टिलमध्ये पोपटराव पवार, तसेच आ. नीलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. आर. जी सय्यद, डॉ. मुदस्सिर सय्यद, मुजाहिद सय्यद, अकिल सय्यद उपस्थित होते.
आमदार नीलेश लंके यांच्या सुपे रस्त्यावरील संपर्क कार्यालयात पोपटरावांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले. तेथे आ. लंके यांनी पवार दांम्पत्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. पवार यांच्या स्वागतासाठी हिवरेबाजार परीवाराचे सदस्य मोठया उत्साहाने उपस्थित होते. वाडेगव्हाण फाटा ते हिवरेबाजार अशा चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

