इंदापूर तालुक्यात १९८ जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ७००० विद्यार्थ्यांसाठी अध्ययन क्षमता विकास हा प्रकल्प राबविला जाणार.
इंदापूर तालुक्यात सी. वाय. डी. ए . संस्था, प्रेसिडेंट फौंडेशन आणि इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी अध्ययन क्षमता विकास हा प्रकल्प.
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी इंदापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी जे तीन दिवसीय कार्य शाळेचे जे आयोजन करण्यात आले होते ते व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात आले. कोरोनाच्या काळात मागील २ वर्षात पायाभूत शिक्षणात विद्यार्थी मागे पडले आहे. त्याची दखल घेऊन पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यात सी. वाय. डी. ए . संस्था, प्रेसिडेंट फौंडेशन आणि इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन क्षमता विकास प्रकल्प याची सुरुवात करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्षातले पायाभूत समजले जाणारे पहिली आणि दुसरीच्या वर्गाला समोर ठेऊन सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्प राबविणारा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे शिक्षक प्रकल्प योग्य पद्धतीने राबविण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६/१०/२०२१ बीट निमगाव केतकी व बीट लासूर्णे, दिनांक २७/१०/२०२१ बीट सणसर व बीट भिगवन व दि. १२/११/२०२१ बीट इंदापूर व बीट बावडा या कार्यशाळा पार पाडल्या. कार्यशाळेत साध्या आणि सोप्या पद्धतीने लहान मुलामुलींसाठी अध्ययन पद्धती शिकविण्यात आल्या. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. १९८ जिल्हापरिषद शाळेतील तब्बल ७००० विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या कार्यशाळेला सतिश भोंग यांनी कृतियुक्त मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन इंदापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. स्वाती बापूराव शेंडे यांनी केले व कार्यशाळेस मार्गदर्शन देखील केले. इंदापूर तालुक्यातील इयत्ता १ ली व २ री मधील १००% विद्यार्थी मूलभूत अध्ययन विकसित होईल असा विश्वास व्यक्त सभापती यांनी केला.या
कार्यशाळेला तालुक्याचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट आणि गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी सुनील मुगळे, सौ. छाया धापटे, उपशिक्षक सतिश भोंग तसेच तालुक्यातील इतर शिक्षक उपस्थित होते. सी. वाय. डी. ए . संस्थेकडून व्यवस्थापक प्रमोदीनी नाईक आणि कौस्तुभ हे कार्यशाळेत उपस्थिती होते.

