राहाता । प्रतिनिधी:- राज्यातील रझाकारी तिघा डी सरकारने राज्य परिवहन महामंडळ हें राज्य शासनात विलीन करावे या रास्त मागणीसाठी एस, टी कर्मचाऱ्यांनी पुकारालेल्या "बेमुदत संपास" दडपशाही करत राज्यसरकारने हजारो कर्मचारी निलंबित केले. त्याचा निषेध म्हणून व कर्मचाऱ्यांच्या सर्व मागाण्यांच्या त्वरित मान्य करून यासाठीचे समर्थनाचे पत्र भाजपा ओबीसी मोर्चा, राहाता तालुक्याच्या वतीने आज देण्यात आले..!
ठाकरे सरकारने राज्यातील जनतेला वेठीस धरू नये. अशी मागणी यावेळी उपस्थित प्रवाशांनी केली आहे.
यावेळी मा. जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या सुचनेने व मा. जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तसेच याप्रसंगी श्री सरचिटणीस श्री भिमराज मुर्तडक, संपर्क प्रमुख श्री वैभव शिंदे, प्रसिद्धी प्रमुख श्री नितीन वाके, श्री संजय सजन, सचिव श्री विजय राहाते, श्री सुनिल भुजाडे, श्री सोमनाथ शिंदे, श्री कैलास खोंडे, श्री गोरक्ष पवार, ओम राहाते यावेळी उपस्थित होते.

