shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पतसंस्थेत भरदिवसा दरोडा ; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१
जुन्नर : तालुक्यातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की ,१४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलीस करत चालू आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close