shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक! प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास, नगर जिल्ह्यातील घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१


जामखेड : तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रेयसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकले नाही. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील घोडेगाव येथे राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या मामाच्या घरी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय तरूणाला समजली. त्यानंतर सदरील तरूण हा मयत मुलीच्या घरी गेला. तेथे त्याला मुलीने आत्महत्या केल्याचे समजले. प्राथामिक माहितीनुसार या तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबध होते.
दरम्यान मयत 16 वर्षीय मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. यानंतर तिचा प्रियकर 23 वर्षीय तरुणाने देखील ‘मी देखील माझे जीवन संपवत आहे’ असा व्हॉटसपवर स्टेट्स ठेवला. आणि काही तासांत त्यानेही शेतात जाऊन लिबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

एकाच दिवशी दोघा अल्पवयीनांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, आपटी येथील या दोघांचे प्रेम संबध होते. मुलीचे व मुलाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीने आत्महत्या केल्यावर मुलीकडील मंडळी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. पण एका तासात मुलानेही आपली जीवनयात्रा संपवली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close