शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
पारनेर :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे सुमारे 60 लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण तसेच विविध उदघाटन कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.
या वेळी आमदार नीलेश लंके, अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाअध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच रेश्मा पवार, माजी सरपंच संदीप मगर, उपसरपंच मंगल मगर, पुनम मुंगशे, संध्या औटी, कारभारी पोटघन, सचिन पठारे, राजू शिंदे, राजू शेख, मनिषा मगर, बाबासाहेब मगर, राजू मगर, सचिन पवार, भाऊसाहेब भोगाडे आदी उपस्थित होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, या फक्त एक हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावाने विविध विकास कामे करूण इतर गावांपुढे आदर्श व निर्माण केला आहे. मी या पुढेही या गावाला अधिकचा निधी देणार आहे. राजकारणात इर्षा असावी मात्र मतभेद नसावेत.
राज्याचा 50 टक्के निधी केवळ ग्रामस्वच्छता व पाणी पुरवठ्यावर केला जातो असेही ते म्हणाले.राज्यात कोरोनामुळे सुमारे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. यासाठी नियम पाळा. दोन डोस ज्यांनी घेतले नाही अशा शेतकऱ्यांचे ऊस तोडू नका. मजुरांना कामावरही घेऊ नका, असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

