पुणे:- शुक्रवार दि२६/११/२०२१ रोजी सकाळी १०:०० ते ११:३० या वेळेत श्रीमती.सी.के.गोयल व कला आणिवाणिज्यमहाविद्यालय दापोडी ,पुणे -१२राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात "संविधान दिन"कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवातीला २६/११/२००८ रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात वीर मरण आलेल्या सर्व भारत मातेच्या विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आणि त्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व घटनेची प्रत, यांचे पूजन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संविधान दिनाच्या निमित्त मार्गदर्शक/व्याख्याते मा. श्री. भरत शिरसाट (समन्वयक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन केंद्र. बुद्धविहार, दापोडी, पुणे) यांचे "भारतीय संविधान आणि आपली जबाबदारी"या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी भुषविले.
मान्यवर व्याख्याते श्री.भरत शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना म्हटले"भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ असून आपण प्रत्येकाने त्याचे पालन करणे ते आचरणात आणणे आवश्यक आहे.घटनेत सांगितलेली मूल्य, तत्वे, नियम ,कायदे, हक्क, कर्तव्य, स्वातंत्र्य ,समता ,बंधुता, याचा आपण अंगीकार केला पाहिजे".
या कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. निशा मोरे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख) व मा. श्री. गोरक्ष ब्राह्मणे (बंधुता प्रतिष्ठान) यांनी संविधानबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी सर याप्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले"विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून त्यातील मूलभूत गोष्टी आचरणात आणाव्यात आणि समाजाला समजून द्याव्यात आणि चांगला नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी".
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे त्यांचे सहकार्यांनी केले.
आभार प्रा डॉ सिद्धार्थ कांबळे (एन. एस. एस. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता. त्यामध्ये प्रा. डॉ. शोभा शिंदे, प्रा. डॉ. सोमनाथ दडस, प्रा. सुरेखा हारपडे, प्रा. अमरदीप गुरमे, प्रा. विनोद डिके, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. ज्योती लेकुळे, श्री. कपिल कांबळे, श्री. लक्ष्मण कोहिनकर, श्री. हनुमंत गायकवाड, श्री. लक्ष्मण मुरकुटे हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी ७६ विद्यार्थीनीं उपस्थिती नोंदवली.
वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

