shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानमध्ये हुतात्मा दिन साजरा.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठानमध्ये हुतात्मा दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीमध्ये २६/११ दिनानिमित्त शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानिमित्ताने अमरदीप तयार करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये शहीद जवानांच्या श्रद्धांजली चा देखावा सादर करण्यात आला. शहीद जवान अमर रहे अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या या निमित्ताने विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतांनी देशप्रेम जागृत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी ११११ मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली.२६/ ११ च्या घटनेची माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा ढोले मॅडम यांनी शहीद झालेल्या पोलीस, सुरक्षा रक्षक आणि नागरिकांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष  श्री श्रीमंत ढोले सर सल्लागार प्रदीप गुरव साहेब सचिन हर्षवर्धन खाडे सर विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री सम्राट खेडकर सर प्रशासक गणेश पवार सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close