shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा एज्युकेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी उदयन गडाख यांची वर्णी...!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- सोनई येथील  मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी जलसंधारणमंञी नाम.शंकरराव गडाख यांचे चिरंजीव युवानेते उदयन गडाख यांची सर्वानुमते निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.यामुळे नेवासा तालुक्यातील गडाख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.उदयन गडाख हे पुण्यातुन एमबीए झाले झाले असुन व्यवस्थापन शास्ञामध्ये ते निष्णात असल्याचे मुळा एज्युकेशनच्या विश्वस्थ मंडळाने विश्वास दाखवत त्यांची निवड केली.

उदयन गडाख हे जलसंधारण मंञी नाम.शंकरराव गडाख यांच्या मागे नेवासा तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.यामुळे नेवासा तालुक्यात एक मोठा तरूण कार्यकर्त्यांचा संच त्यांनी तयार केला असुन ते मृदु स्वभावाचे आहेत.गेल्या काही दिवसापुर्वी शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कनिष्ठ कन्या डाॅ.निवेदिता यांच्याशी उदयन गडाख यांचा विवाह ठरल्याने ते राज्याच्या राजकारणाच्या पटलावर आले आहेत.यामुळे आगामी काळात  गडाख घुले यांचे नातेसंबध नेवासाच्या राजकारणात पाॅवरफुल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जेष्ठनेते मा.खा.यशवंतराव गडाख  यांनी स्थापन केलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेचे इवलसे रोपटे वाढवण्यात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांचे मोठे योगदान आहे.पण गेल्या काही दिवसा पासुन प्रशांत गडाख हे कोरोना झाल्या नंतर आजाराशी लढा देत असल्याचे त्यांचे बंधु नाम.शंकरराव गडाख यांनी सांगितले होते.मुळा एज्युकेशन संस्थेचे सोळा माध्यमिक विद्यालय, सहा इंग्रजी माध्यमाचे विद्यालय तर अन्य सात महाविद्यालय असून 20 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचा एकूण 1300 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. संस्था व यशवंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
close