shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी परिसरातील तोडलेली वीज जोड पुन्हा वीज पूर्ववत करा.

वडापुरी परिसरातील तोडलेली वीज जोड पुन्हा वीज पूर्ववत करा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर महावितरणने शेतकऱ्यांची वीज खंडित केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. तालुक्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, रस्ता रोको सुरू आहेत. आज(दि.२६) शुक्रवारी वडापूरी येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत तोडलेली वीज पूर्ववत करण्याची मागणी केली. वीज वितरण महामंडळाने कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला आहे. अग्रिम राशी विद्युत कायदा २००३ च्या ६५ अन्वये अगोदरच त्यांना दाम दुप्पट पैसे मिळालेले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांना वाढीव वीज बिले आली असून ती तात्काळ दुरुस्त करून मिळावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. गेली दोन वर्षे शेतकऱ्यांचे तसेच उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. सरकारमधील पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी आमचे सरकार आल्यास संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफ करू अशी घोषणा केली दिलेला आपला शब्द फिरवला त्यामध्ये अतिवृष्टी तसेच कोरोना मध्ये बाजार समित्या बंद शेती पिकांना कवडीमोल दर मिळाला अशा अनेक अडचणींना शेतकरी सामोरे गेला असून सरकारने आपला शब्द पाळावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी   अमोल चंदनशिवे, चेअरमन महेश शिर्के, भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले, संतोष देशमुख, श्याम थोरात ,शिवाजी भोसले, बापू माने ,प्रमोद बोधले, हरीभाऊ जाधव ,गुलाब चंदनशिवे, किरण शिर्के इत्यादी उपस्थित होते.
close