शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
प्रतिनिधी : भारतीय रेल्वेने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या अंतर्गत कोणतीही राज्य सरकार किंवा कंपनी भाड्याने ट्रेन घेऊ शकते. यासाठी स्टेक होल्डर्सशी रेल्वे मंत्रालयाची चर्चा झाली आहे. या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे.
या योजनेंतर्गत, 3333 कोच म्हणजेच 190 गाड्या रेल्वेने राखीव ठेवल्या आहेत.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शवणाऱ्या थीमवर आधारित असतील.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार सुमारे 190 गाड्यांचे वाटप करण्यात आले आहे. चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी या गाड्यांची संख्या वाढवता येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.या विशेष ट्रेन्स पर्यटनस्थळांसाठी चालवल्या जाणार आहेत. रेल्वेमंत्री म्हणाले की, भारत गौरव ट्रेनमुळे
लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी गाड्या चालवणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आजपासून या गाड्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या
गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय मार्ग ठरवण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC दोन्हीद्वारे चालवली जाऊ शकते. या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

