शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
आरडगांव : राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगांव शिवारात दोन मोटार सायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मानोरी येथील ॠतुराज अशोक काळे या तरुण युवक नगर येथील रूग्णांलयात नेत असतानाच मुत्य झाला तर जखमी सहाजन पैकी एकाची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे समजते तर जखमींना नगर व शिर्डी वेळोवेळ्या खासगी रूग्णांलयात उपचार सुरू आहेत.
राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगांव येथे रविवारी राञी सात वाजेच्या सुमारास मानोरी येथील अक्षय जनार्दन आढाव, ऋतुराज अशोक काळे(मयत), मयूर बाळासाहेब मोरे हे तिघे एक मोटार सायकल वरुन मानोरीकडे जात असताना व कोंढवड येथील अजय बर्डे, किरण माळी हे आपल्या दोन लहान मुलांसमावेत घराकडे जात असताना आरडगाव शिवारातील देशमुख विट-भट्टीच्या जवळ हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भयंकर होता की दोन्ही मोटरसायकल चक्काचूर झाल्या आहेत तर सर्वच सात जण जखमी अवस्थेत स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरु करत रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमींना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान रूग्णांलयात नेत असतानाच मानोरी येथील ॠतुराज काळे (वय २१) याचा मृत्यू झाला आहे. तर मयूर मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कोंढवड येथील जखमींना जिल्हा रूग्णांलयात उपचारासाठी दाखल केले असुन त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मयत ॠतुराज काळे यांचे वडीलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू झाल्याने त्याची आई, बहीन व तो मानोरी येथील आपल्या मामाच्या घरी रहात होता. आता त्यांच्या पश्चात आई, बहिन, मामा असा परिवार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

