नागरमोथा, वाळा, माका, कचोरा, आवळा पावडर, बावची, लोध्र, केवडा, आंबेहळद, मुलतानी माती, तुळशीची पाने, कडुलिंब पाने, मसूर डाळ, अश्वगंधा, चंदन, बेसन यांचे औषधी गुणधर्म उटण्यांमध्ये एकवटलेले आहेत. वरीलपैकी एकही वनस्पती विषारी नाही. या वनस्पतींमुळे त्वचा सतेज होते व गंधामुळे शरीर प्रसन्न होते. उत्साहवर्धक असे उटणे दररोज अंघोळीसाठी वापरावे. असे केल्यास त्वचारोग नाहीसे होतील.
याबरोबरच अंघोळीचे पाणी नदीमध्ये जाते त्यासोबतच औषधी वनस्पती नदीपर्यंत पोचतील व या वनस्पती खाऊन जलचर सुदृढ होतील व नदी स्वच्छ करण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लावतील. नदीमध्ये दररोज जाणारा साबणाचा फेस व अन्य घातक पदार्थ, उटण्याचा वापर जास्त झाला तर कमी प्रमाणात नदीत जातील. हे उटणे प्रत्येकाने वापरले तर नदी स्वच्छता उपक्रमात फारच मोठ्या प्रमाणावर सकारात्मकता प्राप्त होऊ शकेल.
विचार करा! विषारी नदी पुन्हा पवित्र करायची असेल तर दररोज उटणे वापरा. निरोगी राहा. आपल्या मित्रपरिवारात हा संदेश राष्ट्रहितास्तव पोहचवा. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य/पर्यावरण साक्षरता जनजागरण मोहिमेत सहभागी व्हा.
लेखक : चंद्रकांत शहासने, निसर्गोपचारक.
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

