shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापुरातुन अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी शिताफीने पकडला..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१


 बेलापुरातुन अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा आरोपी श्रीरामपूर पोलिसांनी शिताफीने पकडला…


श्रीरामपूर : बेलापुर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावुन पळवुन नेवुन लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका जणा विरुध्द श्रीरामपुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
        बेलापुर ऐनतपुर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसापूर्वी फूस लावून पळवुन नेले होते. त्या बाबत बेलापुर पोलीसांनी भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नातेवाईकांनी त्या मुलीस पोलीसांच्या स्वाधीन केले.त्यानंतर पोलीसांनी पळवुन नेणारा असलम शेख यास शिताफीने ताब्यात घेतले.त्यानंतर पहील्या दाखल गुन्ह्यात भादवि कलम 376 बाल लैंगिक अत्याचार पोस्को आदि वाढीव कलम लावण्यात आले असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील,हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे,रामेश्वर ढोकणे ,निखील तमनर, पोपट भोईटे,हरीष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेवुन तीला ताब्यात घेतले.मुलीस पळवुन नेणारा असलम शेख यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि विठ्ठल पाटील, हवालदार लोटके करत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close