शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१
राहुरी : शहरातील बाजारपेठेत दिवाळसणानिमित्त दुकान लावण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. ही घटना बुधवार दि. 3 नोव्हेंबर रोजी घडली. यावेळी दोन महिलांना लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दरम्यान दोन्हीही महिला गंभीर जखमी झाल्या असून राहुरीतील तीन तरुणांविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ.आशा संतोष पटारे, (वय 40 वर्षे , धंदा- भाजीपाला विक्री, रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सौ. आशा पटारे या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सौ.आशा पटारे यांची आई गोदाबाई शेटे या दि. 3 नोव्हेंबर रोजी शहरातील भागिरथी शाळा रोडलगत मोबाईल दुकानासमोर भाजीपाला विक्री करत होत्या. यावेळेस आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात तसेच एक पप्पू नामक तरुण हे त्या ठिकाणी आले. आणि सौ. आशा पटारे यांना म्हणाले, तुम्ही येथे भाजीविक्री दुकान लावायचे नाही. असे म्हणून शिवीगाळ करत होते.
तेव्हा सौ. आशा पटारे त्यांना म्हणाल्या, तुम्ही माझी आई व भावाला शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी सौ. आशा पटारे यांचे आईला शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरूवात केली. तेव्हा सौ. आशा पटारे त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेत सौ. आशा पटारे, गोदाबाई शेटे व संतोष शेटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सौ. आशा पटारे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी अमोल बाबासाहेब थोरात, उमेश बाबासाहेब थोरात दोघे रा. तनपुरेवाडी रोड तसेच एक पप्पू नामक तरूण या तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

