shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणसांना मोठा आर्थिक फटका - स्वप्नील सावंत. इंदापूर मध्ये काँग्रेसची जनजागृती रॅली

इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणसांना मोठा आर्थिक फटका - स्वप्नील सावंत.

 इंदापूर मध्ये काँग्रेसची जनजागृती रॅली


इंदापूर प्रतिनिधी:- इंधनाच्या वाढत्या दरामुळे सामान्य माणसांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आरंभलेल्या जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून दि.२६ रोजी इंदापूर शहरात जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहरातील जनजागृती रॅली काढण्यात आली आहे असे इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे  अध्यक्ष स्वप्निल सावंत म्हणाले.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली असून सरकारी खर्चातून त्यांनी कोरोना लसीकरणातही जाहिरातबाजी केली आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मोदी सरकारला आंदोलनाची नव्हे तर निवडणुकीची भाषा कळते त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना सत्तेपासून बाजूला करा असे आवाहन स्वप्नील सावंत यांनी केले.

यावेळी उत्कर्षा रुपवते,महेश ढमढेरे यांनीही आपले मत व्यक्त केले.
 
या वेळी उत्कर्षा रुपवते (प्रभारी पुणे जिल्हा काँग्रेस), दादू शेठ खान (प्रभारी पुणे जिल्हा काँग्रेस),संग्राम मोहोळ (उपाध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस),महेश ढमढेरे ( खजिनदार पुणे जिल्हा काँग्रेस),काकासाहेब देवकर, चमणभाई बागवान,जाकीरभाई काझी,डॉ संतोष होगले, महादेव लोंढे, श्रीनिवास शेळके, आजिनाथ रेडके,आकाश पवार, राहुल वीर, श्रीनिवास पाटील, राहुल जाधव, समीर शेख, दत्तात्रय देवकर,युवराज गायकवाड,तुषार चिंचकर सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close