पुणे : नुकतेच येरवडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात अखिल महाराष्ट्र वडार समाज बहुउद्देशिय सेवा भावी स़ंस्था, पुणे आयोजित वडार वधु-वर परिचय मेळाव्यात संजय देवकर,परळी वैजनाथ यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सत्कार समाज कल्याण आयुक्त नागेश चौगुले साहेब दयानंद इरकल, राकेशजी विटकर, जेष्ठ साहित्यिक टि. एस.चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मनोहर मुधोळकर, हैद्राबाद येथील ओसीसीआय संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार नरसिंहराव गुंजी, कर्नाटक येथील ओसीसीआय राष्ट्रीय सरचिटणीस शिवरूद्र स्वामी, शांताराम मनवरे यांच्या शुभहस्ते 21 नोहेंबर 2021 रविवारी अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, येरवडा, पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
हया कार्यक्रमाचे संयोजन हरिश बंडीवडार, रमेश जेठे, अशोक पवार यांनी केले होते. संजय देवकर यांनी संयोजकांचे आभार मानले आहे.

