आपणास हे माहिती आहे काय? की, सम्राट अशोकाने वने निर्माण केलीच पण त्याबरोबरच इसवी सन पूर्व २२५ मध्ये वन्यजीवांसाठी अभयारण्य स्थापन करण्याचा आदेश जाहीर केला होता. असे अभयारण्य स्थापन करणारा सम्राट अशोक हा जगातील पहिला शासक होय. पर्यावरण संवर्धनाचा स्तंभ सम्राट अशोकाने उभारला. या स्तंभावर लिहिलेल्या मजकुरात पर्यावरण आणि जैवविविधता याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आलेला आहे. यावर जो मजकूर कोरलेला आहे. त्यामध्ये धर्माविषयीचे प्रेम, आत्मपरीक्षण, आदर, दुष्ट-अनिष्ट वाईट गोष्टींविषयीची भीती याखेरीज या आणि पुढच्या जगातील आनंद आणि समाधान प्राप्त होणे कठीण आहे.
देवाचा लाडका राजा प्रियदर्शी अशोक असे सांगतो की : प्राण्यांना संरक्षण देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. पोपट, मैना, घोडे, जंगली बदके, नंदीमुख, वटवाघळे, राणी मुंग्या,मासे, कासवे, खारी, हरणे, बैल, रानटी गाढवे, जंगली कबूतरे, पाळलेली कबुतरे आणि उपयुक्त नसलेले आणि खाण्यायोग्यही योग्य नसलेले सर्व चतुष्पाद प्राणी यांचे संरक्षण केले जावे. याशिवाय पिल्ले असलेल्या किंवा पिल्लांना अंगावर पाजत असलेल्या अंगावर पाजत असलेल्या शेळ्या, मेंढ्या इ. प्राणी तसेच सहा महिन्याहून लहान असलेली पिल्ले यांची हत्या केली जाऊ नये. मारण्यासाठी कोंबड्यांना पाळू नये. अकारण किंवा प्राण्यांना मारण्यासाठी वने जाळू नये. जिवांच्या लपण्याच्या जागा नष्ट करू नयेत. एका प्राण्याच्या मांसावर दुसऱ्याला पोसू नये.उपरोक्त माहिती पर्यावरण दिनविशेष या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत नमूद केलेली आहे.
ही माहिती आपण वाचून इतरांनाही सांगा व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण जनजागरण उपक्रमात सहभागी व्हा.पर्यावरण, आरोग्य आणि राष्ट्रभक्ती या विषयास वाहिलेले चौथे राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने पर्यावरण साक्षरता मोहिमेअंतर्गत प्रसारित.
संकलक : चंद्रकांत शहासने, ( देशभक्तकोशकार) पुणे.
मोबाईल क्र. ९८८१३७३५८५

