shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरती जय गोमाता..!


(चाल : आरती ज्ञानराजा)



आरती जय गोमाता।
तुझे चरणावरीमाथा ।।
अनंत उपकार।
कैसे सांग फेडू आता ।।१
 
साधुसंत तुज पूजिती। 
तूच वंदनीय माय ।।
दुःख आणि दारिद्र्यही।
तुझ्या दर्शनाने जाय।।२

तूच माझी अन्नदात्री। 
पुण्यवंत जशी माय।
दूध दही सेवनाने। 
सर्व व्याधी दूर जाय।।३

शेतीसाठी बैल राबतो।
सर्वां आनंदही देतो।। 
धनधान्य पिकवितो।
सुख-समृद्धीचा।।४

पंचामृत पंचगव्य। 
शेण-गोमूत्र प्राशिता।। 
आरोग्य पर्यावरण।
तुझ्या जवळी रहाता।।५

दत्तापाशी तुझी छाया।
आम्हा सर्वावरी माया।।
दूध तूप पक्वान्नाने।
सारी उजळते काया।।६

संस्कृती आरोग्याचा। 
स्त्रोत तुझ्या प्रांगणात।
सानथोरा आत्ता दे दे।
पोटभर आशीर्वाद।।७

रचनाकार : चंद्रकांत शहासने,
निसर्गोपचारक. 
मोबाईल : ९८८१३७३५८५
close