shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर तालुक्यात शेती आणि पाण्याच्या वादाच्या छळातून कंटाळून एकाची लिंबाच्या झाडाला गळफास...!



संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):
शेती व पाण्याच्या वादातून पिंप्री लौकी येथील एकाची जनाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेती व पाण्याच्या वादातून संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाऊसाहेब किसन गीते असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भाऊसाहेब गीते यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संदीप भाऊसाहेब गीते यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 
शेतीचा वाद आणि सामायिक विहिरीचा पाण्याचा वापर या कारणामुळे शारीरिक व मानसिक त्रास तसेच मारहाण व शिवीगाळ याप्रकाराला कंटाळून गीते यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. फिर्यादीनुसार आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमनाथ गीते, मनीषा गीते, तानाजी गीते, गौरव गीते, स्वाती गीते, सर्व रा. पिंप्री लौकी ता. संगमनेर यांच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
close