shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर राज्य करणारे पडस्थळचे अष्टपैलू नेतृत्व मा. महेंद्रदादा रेडके.४२ व्या अभिष्टचिंतन पर विशेष लेख

सर्वसामान्य नागरिकांच्या मनावर राज्य करणारे पडस्थळचे अष्टपैलू नेतृत्व मा. महेंद्रदादा रेडके.

४२ व्या अभिष्टचिंतन पर विशेष लेख
इंदापूर प्रतिनिधी: पडस्थळ गावचे अष्टपैलू नेतृत्व आणि इंदापूरत तालुक्यात आपल्या कार्य कर्तुत्वाने आणि सर्वसामान्य नागरिक व युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, युवक उद्योजक यांना प्रेरणा देणारे, रेडके परिवाराचे आधारस्तंभ तसेच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू आणि निष्ठावंत.  जे आपल्या स्मितहास्य स्वभावातून आपलंसं करतात तसेच स्पष्ट आणि परखड स्वभाव असलेले सामाजिक ,राजकीय, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणारे, जनसामान्यांचे नेतृत्व मा. महेंद्रदादा रेडके यांच्या ४२ व्या अभिष्टचिंतन दिवसी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांकडून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
काही माणसे जन्मताच पैसा प्रसिद्धी घेऊन जन्माला येत नाहीत ते स्वतः कष्ट ,चिकाटी, जिद्द व मेहनतीच्या जोरावर आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करीत असतात. त्यापैकी महेंद्रदादा रेडके हे एक अष्टपैलू नेतृत्व पडस्थळ गावात उदयास आले.
त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडस्थळ येथे ,माध्यमिक शिक्षण नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर व उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण आय कॉलेज इंदापूर याठिकाणी इतिहास विषयातून पदवी घेत झाले आहे. त्यांनी याच काळात पुणे ,कोल्हापूर ,अकलूज या ठिकाणी पैलवानकी करून आपल्या शरीराची जडणघडण, मित्रपरिवार स्नेहबंध निर्माण करून तेथूनच आपल्या जीवनातील खास शैलीची सुरुवात केली. शालेय जीवनात कुस्ती मध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवून एक स्पर्धात्मक जीवनातील आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न केला.
 राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर त्यांचे आजोबा कै. भगवान रेडके हे बिनविरोध ३५ वर्ष श्री.साने गुरुजी विविध कार्यकारी सेवा सोसायटी पडस्थळ चे चेअरमन होते .तसेच त्यांचे वडील श्री.हरिदास रेडके हे पडस्थळ गावचे बिनविरोध पाच वर्ष सरपंच होते. तर हरिदास रेडके यांची सून पुष्पाताई रेडके या आज पंचायत समिती सदस्य असून त्या एक वर्ष सभापती पदावर विराजमान होत्या. महेंद्र रेडके यांची ओळख माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू निष्ठावंत म्हणून आहे.
महेंद्र रेडके  हे इंदापूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य, स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्रचे मार्गदर्शक व इतर अन्य सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे .त्यांच्या गावातील सार्वजनिक यात्रा - उत्सव मध्ये नियोजनात त्यांचा सहभाग असतो. तसेच यात्रेतील स्वच्छतेपासून सर्व कार्यक्रमात ते सहभागी असतात. कुस्ती क्षेत्रातील सर्व उपक्रम यामध्ये ते नेहमी सहभागी असतात. यांच्या माध्यमातून युवकांना समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळा मार्फत प्रबोधनाचे कार्य ही त्यांच्या हातून घडले आहे. तसेच घोड्यावरती बसून फिरण्या मध्ये ते निपुण आहेत. अशा अष्टपैलू नेतृत्वाचे त्यांच्या वेगवेगळ्या शैलीतून कार्यकर्तृत्वातून ते इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मना पर्यंत पोचले असल्याने त्यांचा अभिष्टचिंतन दिन उत्साहात अनेक चाहत्यांच्या शुभेच्छा तून संपन्न होत आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
close