shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरडाणे येथे आदिवासी टोकरे कोळी फलक अनावरण संपन्न..!

आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, गितांजलीताई कोळी, राज्याचे आंदोलन प्रमुख वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा विधानसभेचे नेते आप्पासाहेब नामदेव येळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, सल्लागार एडवोकेट गणेश सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, धुळे तालुका अध्यक्ष संदीप तवर, कर्मचारी अध्यक्ष अरुण सूर्यवंशी, हेमंत सोनवणे, युवा नेता कमलेश मगरे, अशोक काकुळदे यांच्या मार्गदर्शनाने शिरडाणे ता. जि.धुळे येथे शुक्रवार ५/११/२०२१ रोजी आदिवासी टोकरे कोळी फलक अनावरण करण्यात आले.

गितांजलीताई कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दारूमुळे अनेक लोकांच्या मृत्यू होत आहे. दारूमुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. म्हणून पूर्णपणे दारूबंदी झालीच पाहिजे. यासाठी सर्व आदिवासींनी संघटित व्हावे. संघटनेत प्रचंड ताकद असते. आप्पासाहेब नामदेव येळवे यांनी सांगितले की, तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

 तुमची मुलं उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होऊ शकणार नाहीत व कोणत्या शासकीय योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणून सर्वांनी आदिवासी टोकरे कोळी जमातीचे दाखले काढून घ्यावे असे मार्गदर्शन केले.

प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी सांगितले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव कोळी मल्हार या आदिवासींच्या अनुसुचित जमातीत समावेश केले आहे. जात प्रमाणपत्र कसे काढावे? जातीचा दाखला काढण्यासाठी कोणते कागदपत्र लागते? एफिडेविट कसे करावे? आदिवासी जमिनीचे पुरावे कसे जोडावे? यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वांनी जातीचे दाखले काढून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप शिरसाठ, दिनेश शिरसाठ, शालिक शिरसाठ, नाना शिरसाठ, मधुकर शिरसाठ, राजेंद्र शिरसाठ, रवींद्र शिरसाठ, भटू शिरसाठ, भारत शिरसाठ, उखडू चव्हाण, मगन चव्हाण, देविदास चव्हाण, संतोष जाधव, मच्छिंद्र जाधव, पोपट शिरसाठ, भिला जाधव, महारू जाधव, विशाल शिरसाठ, पिंटू शिरसाठ, साहेबराव शिरसाठ, शिवलाल शिरसाठ, समाधान जाधव, भटू कुवर, भटू निकुम इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
close