शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार ०८ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर: सिव्हिल हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम चालु आहे संरक्षण भिंतीच्या शेजारी फुटपाथ आहे, तो फूटपाथ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने तोडला आहे ,या मुळे पालीकेचेही नुकसान झाले आहे . शहर विद्रुपीकरण करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केली आहे.
सहाय्यक आयुक्त पठारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेने बांधलेला हा फूटपाथ संबंधित ठेकेदाराने तोडण्यासाठी महानगरपालिकेतील परवानगी घेतलेली आहे काय? तसेच सिव्हिल ची संरक्षण भिंत आहे ती अतिशय निकृष्ट दर्जाची बांधत असून ती कोणत्याही क्षणी पडू शकते .त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा पिपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे मनपा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

