नामदार सुनील केदार यांनी घेतले साईनाथांचे दर्शन
शिर्डी प्रतिनिधी :
राज्याचे पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री.मा.ना.श्री सुनील केदार साहेब यांनी आज श्री साईनाथांच्या चरणी लीन होत मनोभावे दर्शन घेतले.शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी ना.सुनील केदार साहेब यांच स्वागत करून सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुहास आहेर,अविनाशजी दंडवते,कृष्णा गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी नामदार सुनील केदार म्हणाले की, कोरोनाचा समूळ नायनाट होऊन महाराष्ट्राचं जनजीवन पूर्वपदावर येऊ दे अशी साईंच्या चरणी प्रार्थना असे ते म्हणाले.

